नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन | पुढारी

नाशिक : बँकेचे भंगार साहित्य विकून बनवली सुसज्ज कॅबिन

 नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

मर्चंट बँकेच्या गेल्या अनेक दिवसापासून पडून असलेल्या विविध निकामी वस्तू एकत्रित करून त्या भंगारत विकून उपलब्ध झालेल्या निधीव्दारे कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या इमारतीच्या वरील रिकाम्या हॉलमध्ये कमी खर्चात सुसज्ज अशी केबिन्स तयार करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सुटसुटीत अशी सुविधा देण्याचा मानस बँकेने केला असून, बँकेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या केबिनचे उद्घाटन सभासद नितीन शेवाळकर व राजेंद्र वडनेरे यांच्या हस्ते करण्यात आले. मागील वर्षी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. तर कोरोना काळात कर्जदारांकडून थकबाकी वसूल न झाल्याने मधल्या काळात बँकेबद्दल अनेक समज गैरसमज पसरले होते. मात्र बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असून ठेविदारांमधला विश्वास वाढविण्यात बँकेच्या संचालक मंडळाला यश प्राप्त झाले आहे. येत्या दोन महिन्यात कर्ज वसुली मोहीम अतिशय कठोररीत्या राबविण्यात येणार असून बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा मानस संचालक मंडळाने वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केला आहे. वर्धापन दिनानिमित्त संचालक राजेश मेतकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत सत्यनारायण पूजन करण्यात आली. यावेळी चेअरमन कोमल कोठावदे ,व्हाईस चेअरमन डॉ . प्रशांत निकम ,संचालक योगेश वाघमारे, हेमंत अहिरराव ,प्रमोद शेवाळकर, केदारनाथ मेतकर, अनिल धामणे, भगवान बागड, सुभाष चंदन, मनीषा शिनकर ,नलिनी मेतकर आदींसह सभासद ,कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button