यवतमाळ : दुचाकीची ट्रकला धडक, बाप-लेकाचा जागीच मृत्यू | पुढारी

यवतमाळ : दुचाकीची ट्रकला धडक, बाप-लेकाचा जागीच मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्‍या भीषण अपघातात दुचाकीवरील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली मृताची पत्नी गंभीर जखमी झाली. तिचाजवळ असलेली बालिका मात्र सुदैवाने बचावली. शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी घुग्घूस मार्गावरील नायगावच्या पुढे बेलोरा फाट्यावर शुक्रवारी रात्री उशीरा हा अपघात झाला.

गणेश चंद्रभान मडावी (वय २८), शिऊ गणेश (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. ते नायगाव येथील रहिवासी आहेत. अपघातात गणेशची पत्नी मयुरी (वय २५) या गंभीर जखमी झाल्‍या आहेत. मुलगी ईश्वरी (वय २) ही किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर जखमी मयुरीला  उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश आणि त्याची पत्नी मयुरी हे दोन मुलांना घेऊन शुक्रवारी सायंकाळी नायगाव येथून दुचाकीने घुग्घूसकडे निघाले होते. बेलोरा फाट्याजवळ अगदी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा होता. अंधारामुळे गणेशला हा ट्रक दिसला नाही. त्यामुळे दुचाकी थेट ट्रकवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवर पुढे बसलेले शिऊ व गणेश यांचा जागीच मृत्‍यू झाला.  मयूरी गंभीर जखमी झाली.  अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button