जळगाव : बापरे.... अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही हा दिला जातो. याचप्रमाने जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दोषींवर कारवाई होणार…
ही तपासणी झाली आणि अहवाल आला की मग या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशीही माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. तर जिल्हा परिषदेच्या वतीने देखील या प्रकरणी पुरवठादराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- भारतीय हॉकी टीमला धक्का, दुखापतीमुळे हार्दिक सिंग संघाबाहेर
- RRR movie : हॉलिवूडला भारतीय चित्रपटांची भूरळ, ‘अवतार’ फेम जेम्स कॅमेरून यांच्याकडून ‘आरआरआर’चं कौतुक
- Shahnawaz Hussain : बलात्कार प्रकरणात शाहनवाज हुसैन यांना धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली