भारतीय हॉकी टीमला धक्‍का, दुखापतीमुळे हार्दिक सिंग संघाबाहेर | पुढारी

भारतीय हॉकी टीमला धक्‍का, दुखापतीमुळे हार्दिक सिंग संघाबाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय हॉकी संघाला आज ( दि. १६ ) मोठा धक्‍का बसला. संघाचा मिडफिल्‍डर हार्दिक सिंग ( Hardik Singh) याला दुखापत झाली असून तो संघातून बाहेर पडला आहे.

ओरिसामध्‍ये सुरु असलेल्‍या हॉकी विश्‍वचषक स्‍पर्धेत स्‍पेनला नमवत भारतीय संघाने विजय सलामी दिली. स्‍पेन आणि
इंग्‍लंडविरुद्धच्या सामन्‍यात हार्दिक याने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले होते. रविवारी इंग्‍लंडविरुद्धच्‍या सामन्‍यातील चौथ्‍या क्‍वार्टरमध्‍ये हार्दिकला दुखापत झाली. ( Hardik Singh)

रविवारी ( दि. १५) रात्री हर्दिकच्‍या पायाचे एमआरआय काढण्‍यात आले. त्‍याला पूर्ण बरे होण्‍यासाठी काही कालवधी लागणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यामुळे आता संपूर्ण स्‍पर्धेतूनच त्‍याला संघाबाहेर राहावे लागणार आहे. हार्दिकच्‍या जागी राजकुमार पाल याला संधी देण्‍यात आली आहे.

हॉकी खेळातील नियमानुसार, जखमी खेळाडूची जागा राखीव ठेवली तरी दुखापतग्रस्‍त खेळाडू बरा झाला तरी त्‍याला स्‍पर्धेत खेळण्‍याची संधी मिळत नाही. हॉकी विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय संघाने दोन सामने खेळले आहेत. यातील स्‍पेन विरुद्धचा सामना २-० असा जिंकला आहे. तर इंग्‍लंड विरुद्धचा सामना अनिर्णित राहिला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button