शेकोटी साहित्य संमेलन : लोककलांचे दस्तऐवजीकरण गरजेचे – प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे

नाशिक : शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या ग्रंथपूजा शेकोटीपूजा प्रसंगी प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, डॉ.गणेश चंदनशिवे, वास्तुविशारद बाळासाहेब मगर आदी.
नाशिक : शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या ग्रंथपूजा शेकोटीपूजा प्रसंगी प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, डॉ.गणेश चंदनशिवे, वास्तुविशारद बाळासाहेब मगर आदी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सांस्कृतिक वेगळेपण टिकविण्यासाठी लोककलांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे असून नव्या काळानुसार त्याचे दृकश्राव्य माध्यमातून चित्रीकरण करून या कला जतन करता येतील असे प्रतिपादन प्रा. शंकर बोर्‍हाडे यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शेकोटी लोककला संमेलन भावबंधन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी लोककलांचे अभ्यासक डॉ.गणेश चंदनशिवे, आमदार सीमा हिरे, वास्तुविशारद बाळासाहेब मगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, शकुंतला वाघ, अश्विनी बोरस्ते, प्राचार्य प्रशांत पाटील, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, किरण सोनार उपस्थित होते. बोर्‍हाडे म्हणाले, तंत्रक्रांतीने दृकश्राव्य माध्यमांची उपलब्धता झाली पण सगळ्या सांस्कृतिक गोष्टी, प्रथा-परंपरा यांचे चित्रिकरण अद्यापपर्यंत झाले नाही. तंत्रक्रांमुळे आपला संवाद कमी होत आहे. अशावेळी साहित्य संमेलने संवादासाठी पूरक ठरतात. त्यातून वाचन संस्कृतीला बळकटी मिळते आणि नव्या लिहित्या हातांना प्रेरणाही मिळत असते. शेकोटी साहित्य संमेलनातून या गोष्टी घडतील त्याचबरोबर आपल्या लोककलांचे जतन-संवर्धन करण्याचे कामही या संमेलनातून होणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले, भारतमातेचे ऋण आदिवासींनी फेडले. पुरुषप्रधान संस्कृतीत वारकरी समुदाय महिला असो पुरुष एकमेकांना माउली म्हणतात. महापुरुष जन्माला यावा असे वाटत असेल तर आधी महामाता जन्माला यावी लागते. लोककला ग्लोबल झाली पाहिजे.

आज मकरसंक्रातीनिमित्ताने होणारे कार्यक्रम (ता.15) असे….
सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार्‍या कार्यक्रमात तळी भरणे, कथा वाचन, अहिराणी कवी संमेलन, बालकवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, साहित्य पुरस्कार कविता संग्रह पुरस्कार असे कार्यक्रम होणार असल्याने नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news