नगर : वृद्ध पती-पत्नीचा निर्घृण खून; चोरीचा छडा ! | पुढारी

नगर : वृद्ध पती-पत्नीचा निर्घृण खून; चोरीचा छडा !

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : चोरट्यांनी घरात शिरून वृद्ध पती-पत्नीची हत्या करून घरातून दोन लाखाचे दागिने चोरल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तालुक्यातील आपेगाव येथे ही घटना घडली होती. घराच्या भिंतीवरून गुन्हेगारांनी छतावर प्रवेश करुन, दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75 वर्षे) व आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65 वर्षे, रा. आपेगाव, ता. कोपरगाव) या दोघांची हत्या करुन रोकड व दागिणे चोरुन पलयान केले होते.

तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार तपास करुन आरोपींचा शोध लावला. जनतेश ऊर्फ जंत्या छंद काळे (वय 21 वर्षे, अजय छंदु काळे (वय 20 वर्षे, दोघे रा. चारी नंबर 45, पढेगाव, ता. कोपरगाव), अमित कागद चव्हाण (वय 20 वर्षे, रा. हिंगणी, ता. कोपरगाव), रेघाबाई रतन भोसले (वय 55 वर्षे, रा. 45 चारी, पडेगाव, ता. कोपरगाव) यांना अटक केली आहे. दरम्यान, कुंदन रतन भोसले (रा. 45 चारी, पडेगाव, ता. कोपरगाव) हा पसार आहे.  दि.3 जून 2022 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास लावून आरोपींच्या मुस्क्या आवळल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जनतेश काळेकडून केले दागिने हस्तगत..!

गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने आरोपी जनतेश छंदू काळे याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले होते. ते न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे चि. जालिंदर भुजाडे यांना पो. नि. दौलतराव जाधव यांनी परत दिले.

Back to top button