Earthquake : नववर्षाची पहाट भूकंपाच्या धक्क्यांनी; दिल्ली व जवळपासच्या परिसरात 3.8 तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake : नववर्षाची पहाट भूकंपाच्या धक्क्यांनी; दिल्ली व जवळपासच्या परिसरात 3.8 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake दिल्लीकरांची नवीन वर्षाची पहाट भूकंपाच्या धक्क्यांनी सुरू झाली. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1 जानेवारीच्या पहाटे 1.19. मिनिटांनी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. 3.8 तीव्रतेचा हा भूकंप होता. याचे केंद्रस्थान हरियाणाच्या झज्जर येथे नोंदवले गेले, अशी माहिती भूकंप विज्ञानाच्या राष्ट्रीय केंद्राकडून (National Center for Seismology) देण्यात आली आहे. एनसीएसने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

Earthquake  31 डिसेंबरच्या रात्रीचे सेलिब्रेशन रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच भूकंपाचे धक्के दिल्लीकरांना जाणवले. या भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे सांगण्यात आले आहे. सध्या तरी या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अन्य कोणतेही नुकसान झाल्याची सूचना नाही.Earthquake

हे ही वाचा :

Indo-China Clash : चीन भारताची एक इंचही जमीन घशात घालू शकत नाही : अमित शहा

अंतराळात ही नववर्षाचे जल्‍लोषी स्वागत

Back to top button