

मुंबई/नागपूर : पुढारी वृत्तसेवा; नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन कॉल पोलिसांना शुक्रवारी रात्री मिळाला. हा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री ८ वाजून ५६ मिनिटांनी आणि पुन्हा ९ वाजून २० मिनिटांनी दोन फोन कॉल आले. कॉलवरील व्यक्तीने ३१ डिसेंबरला रात्री मुंबईत तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशातील आझमगड येथून अझहर हुसेन नावाची व्यक्ती मुंबईत येण्यास निघाली आहे. त्याच्याकडे स्फोटके आणि शस्त्रे आहेत, असेही त्याने सांगितले.पोलिसांनी या कॉलचे लोकेशन तपासले. धारावी येथून हा कॉल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी संशयिताला अटक केली. नरेंद्र कावळे असे त्याचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले.दरम्यान, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा निवावी फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पोलिस कंट्रोल रूमला आलेल्या एका निनावी फोनवर संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. संघ मुख्यालयाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) सुरक्षा आहे.
हेही वाचा