नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन | पुढारी

नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नशिककरांचे खास कौतुक करत अजय बोरस्ते यांच्यासह आलेले नगरसेवक नगरसेविका तसेच भाऊसाहेब चौधरी यांच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा येण्याचा ओघ बघता यापुढे नाशिकचा विकास हे आपले कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

दिंडोरी तालुक्यातील माजी आमदारांसह आजी-माजी पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच, दिंडोरी ग्रामपंचायत सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राजू लवटे, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला. याप्रसंगी ना. शिंदे यांनी नाशिकचे पदाधिकारी अजय बोरस्ते तसेच सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे काैतुक करत मी स्वतः नाशिकला येऊन तेथील विकासासाठी जे-जे करावे लागेल ते-ते करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे, मविप्र संचालक संपत घडवजे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मेधने, माजी सभापती भगवान ढगे, बाळासाहेब दिवटे, सचिन बर्डे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजू ढगे यांच्यासह विलास गोसावी, विठ्ठल उगले, सुभाष राऊत, किरण कड, कांतीलाल गायकवाड, गणेश दवंगे, संतोष कहाणे, दीपक चौधरी, रामदास गायकवाड, माणिक जोपळे, नाना गायकवाड, योगेश दवंगे, चंद्रकला जाधव, गोविंद गायकवाड आदींनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक शहरातील माजी नगरसेवक हरिष भडांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, शिवसेना महानगर संघटक बाबूराव आढाव यांनीदेखील प्रवेश केला. याप्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, आर. डी. धोंगडे, नितीन खर्जुल, प्रताप मेहरोलिया, ॲड. अभय महादास, लकी ढोकणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button