

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंबोडियामधील (Cambodia) एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर ५० हून अधिक लोक हॉटेलमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंबोडियामधील ग्रॅंड डायमंड सिटी हॉटेलमध्ये ही आग लागली. माहिती मिळताच तेथिल अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र, आग प्रंचड भीषण असल्याने यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक लोक जखमी झाली आहेत. तसेच अद्यापही हॉटेलमध्ये ५० हून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आणखी सविस्तर वृत्त थोड्याच वेळात… अपडेट्साठी वाचत राहा पुढारी….
हेही वाचा