नाशिक : लासलगाव महाविद्यालयाचे अकरा छात्र झाले अग्निवीर | पुढारी

नाशिक : लासलगाव महाविद्यालयाचे अकरा छात्र झाले अग्निवीर

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ११ एनसीसी छात्रांची भारतीय सैन्य दलात अग्निवीरसाठी निवड झाली. हे सर्व अकरा विद्यार्थी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे छात्र होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समाधान कोल्हे (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर – खडकी पुणे, महाराष्ट्र), ओम मानमोटे (महार रेजिमेंटल सेंटर – सागर, मध्य प्रदेश), प्रवीण भोकनळ (मराठा लाइट इन्फंट्री – बेलगाव), अक्षय गांगुर्डे (मराठा लाइट इन्फंट्री – बेलगाव), शुभम वाळके (मराठा लाइट इन्फंट्री – बेलगाव), देवीदास पगार (तोफखाना केंद्र – नाशिक), वावधाने ज्ञानेश्वर (मराठा लाइट इन्फंट्री – बेलगाव), तेजस वेताळ (महार रेजिमेंटल सेंटर – सागर, मध्य प्रदेश), शैलेश भुसारे (सशस्त्र कोर – अहमदनगर), प्रवीण गुंजाळ (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर – खडकी पुणे, महाराष्ट्र), शुभम कांगुने (तोफखाना केंद्र – नाशिक), राहुल वाळके (सीआयएसएफ) यांचा समावेश आहे. या सर्व छात्रांचा कौतुक सोहळा नुकताच महाविद्यालयात झाला. सोहळ्यास नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस गोविंद होळकर, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक आदी उपस्थित होते.

एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट बापू शेळके यांनी प्रास्ताविकात यशस्वी छात्रांचा परिचय करून देत अग्निवीर योजनेबाबत माहिती दिली. मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी आज तुमच्यासारखे अग्निवीर बनवण्याची संधी आम्हास मिळत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अग्निवीर कालखंड पूर्ण केल्यानंतर सामान्य जीवन जगताना सैनिकी शिस्त अंगीकारत देशसेवेचे व्रत पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व यशस्वी छात्रांना महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवि व्यास यांनी या अकरा अग्निवीरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button