Virat Gifted his Jersey : कसोटी सामन्‍यातील विजयानंतर विराटच्‍या ‘त्‍या’ कृतीने सारेच भारावले… | पुढारी

Virat Gifted his Jersey : कसोटी सामन्‍यातील विजयानंतर विराटच्‍या 'त्‍या' कृतीने सारेच भारावले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव करत मालिका २-० ने खिशात घातली. सामन्यातील चौथ्या दिवस अतिशय नाट्यमय राहिला.  तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि तैजुल इस्लाममध्ये मोठा वाद झालेला पहायला मिळाला. विराट कोहली केवळ १ धाव करत स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, विराट परतत असताना त्याला बाद करणाऱ्या मेंहदी हसनने जोरदार सेलीब्रेशन केले. यानंतर विराट कोहली आणि तैजुल इस्लाममध्ये मोठा वाद झाला. बांगलादेशचे खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला होता. या सामन्यात मेंहदी हसनने आपल्या फिरकीची जादू दाखवली, त्याने ५ विकेट्स पटकावल्या. (Virat Gifted his Jersey)

चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी १०० धावांची गरज होती. मेंहदी हसनच्या फिरकीने पुन्हा एकदा जादू दाखवली. त्याने ऋषभ पंतला बाद करत त्यामुळे बांगलादेशच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, अश्विन आणि श्रेयस अय्यर केलेल्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ३ विकेट्सने पराभव केला. (Virat Gifted his Jersey)

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि ५ विकेट्स पटकावणाऱ्या मेहंदी हसनचा फोटो समोर आला आहे. या फोटोने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विराट कोहलीने मेंहदी हसनला स्वत:ची जर्सी गिफ्ट दिली आहे. त्यामुळे ज्याने कोहलीला आपल्या गोलंदाजीने अवाक केले त्यालाच कोहलीने गिफ्ट दिले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला ‘सामनावीर’ म्हणून तर चेतेश्वर पुजाराला ‘मालिकावीर’ घोषित करण्यात आले आहे. (Virat Gifted his Jersey)

हेही वाचलंत का?

Back to top button