Tunisha Sharma Death : तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आणखी एका अभिनेत्याची चौकशी | पुढारी

Tunisha Sharma Death : तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आणखी एका अभिनेत्याची चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात ( Tunisha Sharma Death ) तिची  बॉयफ्रेंड शीझान मोहम्मद खानला अटक झाली आहे. न्‍यायालयाने त्‍याला २८ डिसेंबरपर्यत पोलिस कोठडीत सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. तुनिषा गर्भवती होती. बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्यानेच तिने टोकाचे पाउल उचललले असा आरोप तिची मैत्रीण प्रीती तनेजा हिने केला आहे. आता या प्रकरणी आणखी एका अभिनेत्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचा सह-अभिनेता पार्थ झुत्शीने स्वत: या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्याची माहिती दिली आहे. यात तो म्हणाला की, पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावले. त्‍यांनी किरकोळ प्रश्न विचारले. या तुनिषाच्या ब्रेकअप आणि बॉयफ्रेंड शीझान खानविषय़ी प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावर उत्तर देताना, मला याविषयी काहीही कल्पना नाही. तर घटनेच्या वेळी मालिकेच्या सेटवर उपस्थित नव्हतो. तिच्या वैयक्तिक आय़ुष्यात हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नव्हता, असेही त्याने सांगितले.

या घटनेबाबत भाजपचे आमदार राम कदम म्हणाले की, “दोषींना सोडले जाणार नाही, तुनिषा शर्माच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळेल. या घटनेचे नेमके कारण काय? प्रकरणातील सत्य बाहेर येईल. जी काही घटना घडली आहे त्याचा पोलिस यंत्रणा तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button