जालना : शॉर्टसर्किटने ८ एकर ऊस जळून खाक, महावितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप | पुढारी

जालना : शॉर्टसर्किटने ८ एकर ऊस जळून खाक, महावितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

वडीगोद्री (जालना), पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील शॉर्टसर्किट झाल्याने नालेवाडी शिवारात तीन शेतकऱ्यांना तोडणीस आलेला 8 एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना आज नालेवाडी येथे घडली. या दुर्घटनेत 10 लाख रुपयाचे नुकसान झाले असून, सदर घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे झाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारामध्ये गट नंबर 47 मध्ये प्रवीण नामदेव चाटे यांचा 3 एकर, भारत महादेव चाटे गट नंबर 47 मध्ये 3 एकर, अरुण आसाराम घुगे गट नंबर 45 मध्ये 2 एकर असा एकूण 8 एकर तोडणीस ऊस आला होता. मात्र दि 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ८ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये तिन्ही शेतकऱ्यांचे मिळून 10 लाखांचे नुकसान झाले आहे.

ऊस जळून खाक झाला आहे त्यांची समर्थ कारखाना या ठिकाणी नोंद आहे. तोडणीस आलेला उसाचे संपूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. तरी उसाला लवकर तोड द्यावी, अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button