Nashik Crime : धावत्या गाडीत चोरी करणाऱ्या मालेगावच्या चोराला मनमाडमध्ये अटक | पुढारी

Nashik Crime : धावत्या गाडीत चोरी करणाऱ्या मालेगावच्या चोराला मनमाडमध्ये अटक

 नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा

मनमाड रेल्वे स्थानकावर गस्त घालत असणाऱ्या आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत धावत्या गाडीत चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून जवळपास एक लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. मंजूर अहमद मोहम्मद मुस्तकीन असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. तो मालेगाव येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मनमाड रेल्वे स्थानकावर गस्त घालत असणाऱ्या आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलिसांच्या जवानांना मंजूर अहमद व त्याच्यासोबत एक बालक संशयतरीत्या फिरताना आढळून आले. या दोघांना थांबवून त्यांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवडीची उत्तरे दिल्याने त्यांच्या सामानाची चौकशी करण्यात आली. यामध्ये लेडीज पर्स व काही मोबाईल मिळून आले. याबाबत विचारणा केली असता चाळीसगाव ते मनमाड दरम्यान झेलम पंजाब मेल व महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांमधून प्रवाशांकडून चोरी केल्याचे दोघांनी सांगितले.

मिळून आलेल्या सामानाबाबत सखोल चौकशी केली असता यातील जवळपास सर्वच वस्तूंबाबत मनमाड भुसावळ चाळीसगाव यासह विविध पोलीस स्थानकात फिर्याद दिल्याचे आढळून आले. यामुळे आरोपी नामे मंजूर अहमद मोहम्मद मुस्तकीन (20)वर्ष राहणार गुलशन नगर मालेगाव यास भादवि कलम 379 34 अंतर्गत अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जवळपास सहा मोबाईल एक लेडीज पर्स असा एकुण एक लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.  लोहमार्ग पोलीस निरीक्षक एस. बी. जोगदंड, एस. आय. दिनेश पवार, पोलीस हवालदार बोडके, पोलीस हवालदार महाजन, पोलीस नाईक महेंद्र पाटील, संतोष भालेराव, राहुल राजगिरी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button