मंचर : अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

मंचर : अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवैधरीत्या दारू जवळ बाळगल्याप्रकरणी आशिष उत्तम कसबे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस जवान अतिश काळे यांनी दिली आहे.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साल रोडवर हॉटेल महादेवसमोर एक व्यक्ती अवैधरीत्या ओळखीच्या लोकांना दारूची विक्री करीत असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना समजली होती.

त्यानंतर घोडेगाव पोलिस घटनास्थळी गेले. पोलिसांची चाहूल लागताच दारू विक्री करणारा त्याच्याजवळील माल जागेवर टाकून पळून गेला. पोलिसांनी त्याच्याबाबत चौकशी केली असता त्याचे नाव आशिष उत्तम कसबे (रा. घोडेगाव) समजले. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 हजार 400 रुपये किमतीचा माल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान कांबळे याबाबत तपास करीत आहेत.

Back to top button