Nashik : येवल्यात सव्वा लाखाचा नायलॉन मांजा जप्त | पुढारी

Nashik : येवल्यात सव्वा लाखाचा नायलॉन मांजा जप्त

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

आगामी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करताना शहरातून तब्बल एक लाख २० हजार रुपयांचा जीवघेणा नायलॉन मांजा जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचे साठे जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येवला शहर पोलिस शहरातील व परिसरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर आपली नजर ठेवून होते. येवल्यात राज्यातील सर्वाधिक मोठा पतंग महोत्सव साजरा केला जातो . पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन मांजामुळे अनेक ठिकाणी गळा चिरून वाहनचालक मृत्युमुखी पडले आहेत.

शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे, पोलिस नाईक मधुकर गेठे, पोलिस नाईक संदीप पगार, पोलिस शिपाई सतीश बागूल, बाबा पवार यांनी कारवाई करत सादिक रफिक मोमीन यांच्याकडील एक लाख २० हजार रुपयांचा नायलॉन मांजा, ५० हजार रुपये किमतीची, मालवाहू रिक्षा, असा एकूण एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा :

Back to top button