जळगाव : जिल्हा पोलीस दलास मिळणार नवीन वाहनं | पुढारी

जळगाव : जिल्हा पोलीस दलास मिळणार नवीन वाहनं

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह ‘आपले पोलीस’ संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा समावेश आहे.

याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ११२ वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत. याबाबत जिल्हा पोलीस दलास नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तसेच CCTV कॅमेऱ्यासाठी ही १० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून गृहविभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर लागलीच डीपीडीसी मधून मंजुरी देणार असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

११२ वाहन खरेदीस मंजुरी…

डीपीडीसीच्या बैठकीत वाहन खरेदीसाठी पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी यांनी ११२ वाहन खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. यासाठी २ कोटी ६५ लक्ष ९९ हजार २७८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महेंद्रा बोलेरो बी-२ बीएसव्हीआय या मॉडेलची २५ वाहने आणि ८५ होंडा एचएफ डिलक्स व ॲक्टीवा बीएसव्हीआय च्या दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन अशी वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button