नाशिक : सायकलवारीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सटाणा : सटाणा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असा जवळपास 250 किमीचा प्रवास 14 तासांत पूर्ण करणारे बागलाण सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य. (छाया : सुरेश बच्छाव)
सटाणा : सटाणा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असा जवळपास 250 किमीचा प्रवास 14 तासांत पूर्ण करणारे बागलाण सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य. (छाया : सुरेश बच्छाव)
Published on
Updated on

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण सायकलिस्ट ग्रुपने सटाणा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असा जवळपास 250 किमीचा प्रवास 14 तास सायकल चालवून अनोखी जनजागृती केली. 'सायकल चालवा, निरोगी राहा', तसेच 'आपले आरोग्य आणि पर्यावरण चांगले ठेवा', सामाजिक सद्भाव, प्रदूषणमुक्तीच्या संदेश दिला.

डॉ. विशाल आहिरे यांच्या कल्पनेतून बागलाण तालुक्याच्या नामपूर, जायखेडा भागातील डॉक्टर, व्यावसायिक, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्र येऊन बागलाण सायकल ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपचे सदस्य दररोज सकाळी 30, 40 किमी सायकल प्रवास करतात. त्यांनी आतापर्यंत धुळे, नस्तनपूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर असा प्रवास करत ही चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे. रविवारी (दि.11) निघालेल्या सायकलवारीचे वैशिष्ट्य म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक तसेच 14 वर्षाखालील वयोगटातील 10 मुला-मुलींचा सहभाग होता. मोहन सोनवणे, नितीन जाधव या सुपर रँडोनियर (एसआर)सह 55 सायकलिस्ट स्त्री, पुरुष यांचा सहभाग होता. या सायकलवारीचे देवळा येथे डॉ. स्वप्निल आहेर व त्यांच्या ग्रुपने स्वागत केले. पुढे पिंपळगाव (ब.), कोकणगाव, नाशिक येथे लोकमान्य हॉस्पिटल कॅम्पसमध्ये अतुल भामरे, रोहिणी भामरे यांनी सर्व सायकलिस्टसाठी नाश्त्याची व्यवस्था केली. डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. अविनाश पवार, डॉ. क्रांती आहिरे, पूनम भामरे, योगेश भामरे, वर्षा भामरे, मनीषा भामरे यांनी स्वागत केले. तर फ्रावशी अकॅडमी येथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने किशोरमाने सरकार, जगन्नाथ पवार आदींनी सायकलवारीचा उत्साह वाढविला. परतीच्या प्रवासात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीदा काटकर कुटुंबीयांनी ग्रुपचा पाहुणचार केला. या सायकलवारीत मोहन सूर्यवंशी, रवींद्र भदाणे, बाळासाहेब देवरे, शांताराम देवरे, रतन खैरनार, महेंद्र महाजन, प्रा. सुनील बागूल, दीपक सोनवणे, हेमंत भदाणे, कल्याणी भदाणे, सिद्धू भदाणे, प्रणव खरोटे, वैभव पाटील, चेतन जाधव, मनीष येवला, वैष्णव बच्छाव, श्वास आहिरे, तनिष्क सोनवणे, कृष्णा कुलकर्णी, योगेश दशपुते, हिमानी सोनवणे, किशोरी सोनवणे, ज्योती सोनवणे, सावेरी भदाणे, ऋतू भामरे, निसर्ग भामरे, सुचिता सोनवणे, चंद्रशेखर देवरे, मयूर जाधव, सुदर्शन जाधव, एस.पी.आहेर, अनिल सोनवणे, अनिल खैरनार, मृणाल सोनवणे, ओम सोनवणे, मानस सोनवणे, पारस सोनवणे, राजेंद्र सोनवणे, डॉ. हेमंत ठाकरे, ईशान भदाणे, धनंजय कापडणीस, गौरव कायस्थ, सरोज येवला, नामपूरहून स्नेहराज सावंत, डॉ. प्रकाश चव्हाण, डॉ. नितीन कोर, किशोर खैरनार, चेतन सोनवणे, वेदांत बिरारी सहभागी झाले होते. अनिल खैरनार, विकी खरोटे, चेतन जाधव, वैष्णव बच्छाव आदींनी परिश्रम घेतले.

वैज्ञानिक प्रगतीमुळे सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. परंतु, आधुनिक जीवनशैलीत आरोग्य, पर्यावरण, सामाजिक सद्भाव यापासून दूर जात आहोत. याचे रक्षण आणि संवर्धन हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक आहे. सायकलचा जास्तीत जास्त उपयोग करून आरोग्य चांगले ठेवू शकतो. तसेच पर्यावरणाचा र्‍हास टाळू शकतो, हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. – डॉ. विशाल आहिरे, अध्यक्ष, बागलाण सायकलिस्ट.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news