

भारताची सातत्याने डोकेदुखी ठरत असलेल्या चीनने सीमेवर पुन्हा एकदा आगळीक केल्यामुळे उभय देशांतील तणाव नव्याने वाढला आहे. तैवानची संशोधन संस्था डबल थिंक्स लॅब्सने 82 देशांवरील चीनच्या प्रभावाचा डेटाबेस तयार केला असून अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे. सर्वाधिक चिनी प्रभाव असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल आहे. चीन-पाकिस्तान यांचे घट्ट होत चाललेले पाश भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. कारण, भविष्यात चीन पाकिस्तानच्या भूमीवरूनही भारताला आव्हान देऊ शकतो, असे या माहितीवरून स्पष्ट होते.
1) पाकिस्तान, 2) कंबोडिया, 3) सिंगापूर,
4) थायलंड, 5) दक्षिण आफ्रिका, 6) पेरू,
7) फिलिपाईन्स, 8) किर्गिझस्तान,
9) ताजिकिस्तान, 10) मलेशिया.