म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार | पुढारी

म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

म्हेळूस्के गावात अनेक नवनवीन सुविधा होत आहे व अजूनही अनेक काम करायची आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा निधी घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

म्हेळुस्के येथे विविध विकास कामांचा प्रारंभ डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार नेते सुरेश डोखळे, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे आदी उपस्थित होते. विविध विकास कामांमध्ये म्हेळुस्के ते ओझे रस्ता सुधारणा करणे, नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते काँक्रिटीकरण, व्यायामशाळा, स्मशानभूमीचे अनुषंगिक कामे, दलित वस्ती सुधारणा यांच्यासह अनेक कामांचा प्रारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचे लोकार्पण करण्यात आले. या कामासाठी येथील सरपंच योगिता बर्डे व उपसरपंच योगेश बर्डे तसेच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी प्रयत्न केले.

हेही वाचा:

Back to top button