नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पदवीधरांनी 9 डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या तयार करण्यात येत आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2022 पासून पदवीधर मतदारयादीत नोंदणी सुरू झाली असून, प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदारयादीनुसार जिल्ह्यात 30 हजार 67 मतदारांची नोंदणी झालेली आहे. ज्या पदवीधरांनी आपले नाव मतदारयादीत नोंदविले नाहीत त्यांनी यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 18 भरून संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात जमा करावा. अथवा https://ceo.maharashtra.gov.in किंवा https://electoralsearch.in या संकेतस्थळावरही 9 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

मतदारांची संख्या अशी…
सुरगाणा 913, कळवण 1212, देवळा 1354, बागलाण 2636, मालेगाव मध्य 1400, मालेगाव बाह्य 1183, नांदगाव 1399, येवला 1487, चांदवड 1018, निफाड 2951, दिंडोरी 2540, पेठ 584, नाशिक पूर्व 2138, नाशिक मध्य 1266, नाशिक पश्चिम 1475, देवळाली 699, त्र्यंबकेश्वर 472, इगतपुरी 1562, सिन्नर 3778.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news