नाशिक : फळबागेसाठी करा 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना वर्ष 2022-23 च्या लाभासाठी शेतकर्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत महा-डीबीटीवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 16 बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. योजनेसाठी प्रत्येक शेतकर्याचा प्रकल्प हा स्वतंत्र समजण्यात येईल. लाभार्थ्यास पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त 75 दिवसांत फळबागेची लागवड पूर्ण करणे बंधकारक राहील. लागवडीसाठी कलमे/रोपे शासनाच्या रोपवाटिका, कृषी विद्यापीठ रोपवाटिका, कृषी विज्ञान केंद्र तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या खासगी पंजीकृत रोपवाटिका येथून स्वखर्चाने शेतकर्यांनी खरेदी करणे आवश्यक आहे. योजनबाबतची अधिक माहिती महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे. शासनाकडून योजनेसाठी अनुदान उपलब्ध झाल्यानंतर ते थेट शेतकर्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचेही विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.
हेही वाचा:
- NASA’s Orion SpaceCraft : ‘ओरियन’ने टिपली चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे
- पुणे-कोलाड महामार्गावरील खड्डे बुजविले
- औरंगाबाद : डेमू रेल्वेचा अपघात टळला; चालकाचे प्रसंगावधान