नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा | पुढारी

नाशिक : त्रिशरण संस्थेची सिडको मुख्य प्रशासक यांच्याबरोबर औरंगाबादला  सकारात्मक चर्चा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडको उत्तमनगर येथील त्रिशरण बुद्ध विहार व डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्रिशरण संस्थेच्या सिडको मुख्य प्रशासक दीपा मुंडे यांच्याबरोबर औरंगाबाद येथे झालेल्या  सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती   संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष विनोद भडांगे, कोषाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, करुणासागर पगारे ,प्रा. गंगाधर अहिरे, गौतम भालेराव, पांडुरंग आंबुलकर, संपत शिंदे, डॉ.अनिल आठवले, अविनाश कांबळे ,संभाजी सावळे, वामनराव गांगुर्डे,मिलिंद कळवणकर,केदा बच्छाव, संदीप कांकळीज, सदानंद धांडे,मधुकर पवार,आदींसह संस्थेचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे नाशिक येथील सिडको प्रशासक कार्यालयावर त्रिशरण बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक शैक्षणिक भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी तीव्र आंदोलन झाल्यानंतर मुख्य प्रशासक श्रीमती दीपा मुंडे यांच्या बैठक पत्रकानुसार शुक्रवारी त्यांच्या औरंगाबाद येथील दालनात त्रिशरण पदाधिकारी यांची सकारात्मक बैठक पार पडली.

त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी व सिडकोतील समाज बांधवांच्या वतीने नाशिक येथील सिडको प्रशासक कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. तसेच सिडको प्रशासनाच्याबद्द्ल नाराजी व्यक्त करण्यात आल्या. कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सक्षम अधिकारी यांनी उपस्थित राहून निवेदन स्विवकारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्या अनुषंगाने नाशिक तहसीलदार अनिल दौडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून यासंदर्भात औरंगाबाद येथे शुक्रवारी (दि.18) रोजी सकाळी अकरा वाजता मुख्य प्रशासक यांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद येथे झालेल्या सिडको प्रशासकीय कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आणि मुख्य प्रशासक मुंडे यांची संस्थेच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मुंडे यांनी त्रिशरण बुद्ध विहार व डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली

पोलिस बंदोबस्तात वाढ…

नाशिक सिडको कार्यालयात आंदोलनकर्ते सिडको कार्यालयात घुसुन प्रवेशद्वार येथे फलक लावण्यात आला होता. त्यामुळे औरंगाबाद येथील सिडको कार्यालयात मुख्य प्रशासक समवेत बैठक असल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

अहवाल यादी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही…

सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे नाशिक शहरामध्ये करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षण अहवाल यादी नाशिक महानगरपालिका , नाशिकचे आयुक्त यांचेकडून मागविण्यात येईल. अहवाल यादी प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्य सिडको प्रशासक यांनी संस्थेच्या पदाधिकारी यांना दिले आहे.

हेही वाचा: 

Back to top button