सीमंतिनी कोकाटे : चासखिंड येथे बलिदान दिनानिमित्त स्मारकस्थळावर अभिवादन | पुढारी

सीमंतिनी कोकाटे : चासखिंड येथे बलिदान दिनानिमित्त स्मारकस्थळावर अभिवादन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
क्रांतिवीर भागोजी नाईक यांचा 1857 चा उठाव हा सर्व देशवासीयांच्या स्वातंत्र्यासाठी असून क्रांतिवीर भागोजी नाईकांच्या रूपाने सिन्नरकरांची देशात ऐतिहासिक ओळख निर्माण झाल्याचा अभिमान सर्व सिन्नरकरांना असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

नांदूरशिंगोटे येथे चासखिंड येथील क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या स्मारक स्थळी बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भागोजी नाईक यांच्या वंशज अलका पवार होत्या. व्यासपीठावर साहित्यिक डॉ. गोपाळ गवारी, बिरसा ब्रिगेड मातृशक्तीप्रमुख संगीता पिंपळे, माजी सभापती सुमन बर्डे, पोलिस निरीक्षक कांदळकर, दीपक बर्के, सुरेखा सांडगे, कैलास माळी, संदीप पवार, ज्ञानेश्वर माळी, अशोक माळी, भाऊ पाटील दराडे, तुकाराम मेंगाळ, संदीप शेळके आदी उपस्थित होते. दरम्यान, अभिवादन दिनानिमित्त माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांनीही विजयी स्मारक येथे भागोजी नाईक यांना अभिवादन केले. क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या वंशज अलका पवार, लेखक डॉ. गवारी यांच्या हस्ते आदिवासी राजे यशवंत मुकणे यांची यशवंत ही कादंबरी देऊन सीमंतिनी कोकाटे यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे यांनी प्रास्ताविकातून क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे संविधान स्तंभावर नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. प्रशासकीय इमारतीस क्रांतिवीर भागोजी नाईक प्रशासकीय भवन नाव देण्याचे आवाहन समाजाच्या वतीने केले. डॉ. गवारी यांनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम मेंगाळ यांनी सूत्रसंचालन केले. बापू पवार यांनी आभार मानले. आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ, क्रांतिवीर भागोजी नाईक प्रतिष्ठान, बिरसा ब्रिगेड मातृशक्ती, आदिवासी एकता परिषद, आदिवासी युवा फाउंडेशन महाराष्ट्र, शबरी माता संस्था, आदिवासी युवा महासंघ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्मारकासाठी आमदार कोकाटे यांच्याकडून निधीचा प्रस्ताव
सिन्नर तहसीलसमोरील संविधान स्तंभावर क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे नाव घेण्यासंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला पत्र दिले असून, लवकरच नावाचा समावेश होईल. तसेच नांदूरशिंगोटे येथील विजयी स्मारक व सांगवी येथील बलिदानस्थळ अशा दोन स्मारकांसाठी प्रत्येकी 1-1 कोटी निधी आमदार कोकाटे यांनी प्रस्तावित केला आहे व लवकरच स्मारके उभी राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सीमंतिनी कोकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button