Nashik : सिन्नरला दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक

घरफोडी www.pudhari.news
घरफोडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर शहरात दिवसा घरफोड्या करून किंमती ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी तिघा संशयित चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विनोद राजू पवार (३०, रा. नायगाव रोड, सिन्नर), पापड्या उर्फ अक्षय भाऊसाहेब जाधव (२६, रा. लोंढे गल्ली, सिन्नर) व आदित्य दशरथ माळी (२१, रा. डुबेरे, सिन्नर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. सिन्नर शहरासह सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्या. त्यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामुळे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केला. त्यात तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पथकाने तिघा संशयितांना अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली देत सहा घरफोडीचे गुन्हे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख दोन हजार ४७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक व्ही. एस. माळी, उपनिरीक्षक एस. एस. आवारी, अंमलदार एस. एस. बाेराडे, एस. पी. शिंदे, के. आर. कोकाटे, ए. आर. काकड, के. डी. पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिस अधिक्षक उमाप यांनी तपासी पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस देत अभिनंदन केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news