पिंपळनेर : सुरतपर्यंत एस. टी. महामंडळाच्या बसेसद्वारे जाणाऱ्या भाविक-भक्तांच्या बसला भगवंताचे नामस्मरण व सदगुरुंच्या जयघोषाने निरोप देतांना मंडळाचे पिंपळनेर शाखाचे मुख्य जगदीश ओझरकर.
उत्तर महाराष्ट्र
पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना
पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर शाखामधील निरंकारी संत समागम भक्तांचा पहिला जत्था पिंपळनेर वरुन सुरतमार्गे रवाना झाला आहे. संत निरंकारी मंडळाचा 75 वा आंतरराष्ट्रीय "निरंकारी संत समागम" बुधवार, दि. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान समालखा (हरियाणा) येथे सदगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन सान्निध्यात साजरा होतो आहे. या संत संमेलनात सहभागी होण्यासाठी संत निरंकारी मंडळाच्या धुळे झोन मधुन हजारो व महाराष्ट्रातून लाखो भाविक रवाना झाले आहेत. मंडळाच्या पिंपळनेर शाखामधील निरंकारी भक्तांचा पहिला जत्था शुक्रवारी, दि.11 सुरत मार्गे रेल्वेने रवाना झाला आहे.

