मला काही खासगी आयुष्य आहे की नाही?; अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम | पुढारी

मला काही खासगी आयुष्य आहे की नाही?; अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून अलिप्त होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. पवार यांच्या असे अचानक गायब होण्यामागे अनेक कारणांवरून चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर या चर्चांना अजित पवार यांनी आज (दि.११) मावळचा दौरा करून पूर्णविराम दिला आहे. आपण परदेशात गेलो होतो, थोडा खोकलाही होता, अशी माहिती त्यांनी दौऱ्यादरम्यान दिली.

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून येऊन हजेरी लावली होती. मात्र, अजित पवार यांची गैरहजेरीमुळे चर्चांना सुरूवात झाली होती. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानावरही अजित पवारांची प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, अजित पवार यांनी मावळ दौऱ्यात या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सांगितले की, मला खोकला झाला होता, त्यानंतर परदेशात गेलो होतो. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, माीगल चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नसल्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी परदेशात गेलो होतो. परत आल्यानंतर थोडा थकवा होता. पण आज दौऱ्यावर आलो नसतो, तर आणखी वेगळ्याच बातम्या सुरू झाल्या असत्या. मला काही खासगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही बातम्या देऊन बदनामी करायची. हे बरोबर नाही, असे पवार म्हणाले.

Back to top button