Siddhaanth Vir Surryavanshi : प्रसिध्द टीव्ही अभिनेते सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन | पुढारी

Siddhaanth Vir Surryavanshi : प्रसिध्द टीव्ही अभिनेते सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द टीव्ही अभिनेते सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे हार्ट ॲटॅकने निधन झाले आहे. ते ४६ वर्षांचे होते. त्यांना आनंद सूर्यवंशी नावाने ओळखले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना ॲटॅक आला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटांपर्यंत त्यांच्यावर उपचार केले. पण ते अयशस्वी ठरले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर सिद्धांत यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आहे. या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे सांत्वन केले जात आहे.

या मालिकांमध्ये केले काम

सिद्धांतने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सूफियाना इश्क मेरा’ ‘क्यू रिश्तों में कट्टी बत्ती’ यासारख्या मालिकेत ते दिसले होते.

Back to top button