नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार | पुढारी

नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक सिडको येथील प्रशासक सह आठ जणांची बदली नवी मुंबई कार्यालयात झाली. नाशिक सिडको कार्यालयात चार कर्मचारी ठेवले आहे. तर नाशिक सिडकोचा कारभार औरगांबाद संभाजीनगर प्रशासक पाहणार आहेत. अधिकृत अधिकारी नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक येथील सिडकोच्या कार्यक्षेत्रातील भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी, लीज होल्ड ते फ्री होल्ड करण्याची व इतर अनुषंगिक बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने सदर कामाकरीता आवश्यक असणारा कमीत कमी लिपिक वर्गीय कर्मचारीवर्ग कायम ठेवून अन्य अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना करणेबाबत कळविण्यात आले आहे. सिडको तील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा बेलापूर येथील सिडको महामंडळाच्या मुख्यालयात वर्ग करण्यात येत असून, त्यांना नाशिक कार्यालयामधून तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त करण्यात येत आहे यात प्रशासक कांचन रामदास बोधले यांची मुख्य नियोजनका , नवी मुंबई यांच्या कार्यालयामध्ये नियुक्ती केली आहे. तर शिल्पा मिलींद आहिरराव योगेश नारायण सोनवणे रंजना मधुकर सानप प्रियांका संदिप फणसे, उत्तम भानुदास साबळे, उर्मिला राजू रोहितगी, मनोजकुमार वामनराव काळे या कर्मचारी यांची व्यवस्थापक कार्मिक यांच्या कार्यालयामध्ये बदली केली आहे. नाशिक सिडको कार्यालयात नागरिकांना सुविधा देण्यासाठी हरीश दिनकर बडदे  रोहिदास ज्ञानोबा गायकवाड, महेश सुरेश गाडे, रेखा जीवन शिंदे या चार कर्मचारी कार्यरत राहणार आहे. या कर्मचारी यांनी महामंडळाच्या विक्री न झालेल्या सर्व भूखंडांची अभिलेखामध्ये नोंद घेतील. महामंडळाच्या इतर सर्व चल व अचल मालमत्तेची अभिलेखामध्ये नोंद घेतील.

कार्यालयातील सर्व संचिकांची पृष्ठनिहाय प्रमाणित यादी करुन प्रशासक, औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्य प्रशासक, नवीन शहरे यांना सादर करतील. प्रमाणित यादीतील सर्व संचिकांची सेक्टरनिहाय विभागणी करतील. महामंडळामार्फत मंजूर करण्यात आलेल्या विविध आराखड्यांचे एकत्रिकरण करुन प्रमाणित व मूळ आराखडे प्रशासक, औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्य प्रशासक, नवीन शहरे यांना सादर करतील. स्कॅन केलेल्या संचिकांची सॉफ्ट कॉपी व्यवस्थापक ( प्रणाली ) यांना सादर करतील. शासनपत्रान्वये आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडतील व त्यासाठी आवश्यक मंजूरी वेळेत घेतील. प्रशासक संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमूद कार्यवाही पार पाडली जाणार आहे. तसेच मुख्य प्रशासक संभाजीनगर या संपूर्ण प्रक्रीयेचा वेळोवेळी आढावा घेऊन तसा अहवाल मुख्यालयास सादर करतील प्रशासक (औरंगाबाद वरील सर्व कार्यवाही करुन पुर्णत्व प्रमाणपत्र मुख्य प्रशासक) नवीन शहरे यांना सादर करतील . सिडकोच्या सर्व मालमत्ता विक्री न झालेले भूखंड इत्यादींना कुंपण घातले जातील. नाशिक सिडको कार्यालयात अधिकारी नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

Back to top button