

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी नुकसान भरपाईस 79 हजार शेतकर्यांच्या 54 हजार बाधित क्षेत्रास 74 कोटी रुपये मदतीचा अहवाल तयार झाला आहे. तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीने, तर एका मंडळात सततच्या पावसाणे खरीप पिक वाया गेले. तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाणे व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. पिंकाचे नुकसान झाल्याने सरसकट मदत मिळण्याची मागणी शेतकर्यांसह भाजप आमदार मोनिका राजळे व अन्य विरोधी पक्षांनी केली. पिंकाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्वरित पंचनाम्यांचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही तालुक्यात नुकसानग्रस्त पाहणी दौरा करून नुकसान झाल्याची कबुली दिली. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी संयुक्तपणे नुकसाणीचा अहवाल स्थानिक प्रशासनाला सादर केला आहे. तो उशीराने शासन दरबारी सादर झाला.
शेवगाव तालुक्यात शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव या पाच मंडळात अतिवृष्टी झाल्याने 94 गावांत 68 हजार 56 शेतकर्यांचे 48 हजार 206 हेक्टर पिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात कपाशी 37 हजार 258 हेक्टर, तूर सात हजार 18, बाजरी एक हजार 683, सोयाबीन 858, मुग 634, मका 162, उडीद 459, भुईमुग 140 हेक्टर आहे. या बाधित पिकांसाठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टर मर्यादीत 65 कोटी 56 लाख एक हजार 600 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.एरंडगाव मंडळात सततच्या पावसाणे 19 गावांत 11 हजार 278 शेतकर्यांचे पाच हजार 965 हेक्टर पिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात कपाशी पाच हजार 90 हेक्टर, तूर 648, बाजरी 85, सोयाबीन 43, मका 52, भुईमुग 23, उडीद 20, मुग 4 हेक्टर आहे. यासाठी आठ कोटी 11 लाख 24 हजार रुपये मदतीची मागणी आहे.
तालुक्यात सहा मंडळात एकूण कपाशी 42 हजार 348 हेक्टर, तूर सात हजार 666 हेक्टर, बाजरी दोन हजार 951 हेक्टर, सोयाबीन 901 हेक्टर, मुग 638 हेक्टर, मका 214 हेक्टर, उडीद 479 हेक्टर, भुईमुग 163 हेक्टर, अशा एकूण 54 हजार 171 हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रास 79 हजार 334 बाधित शेतकर्यांना 73 कोटी 67 लाख 25 हजार 600 रुपये मदतीचा दुरुस्तीचा अहवाल तयार झाला असून, तो सर्वात उशीरा, म्हणजे गुरुवारी शासन दरबारी सादर झाला.
जिल्ह्यात इतर तालुक्यांचा अतिवृष्टी अनुदानाचा अहवाल सादर झाला असताना येथील प्रशासनाने मात्र यात दिरंगाई केल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. ऑक्टोबरमध्ये तालुक्यात परतीच्या पावसात व अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. पेरणीचा हंगाम उरकल्यानंतर झालेल्या जेमतेम पावसाने पिक काहीसे नजरेत भरणारे झाले. त्यामुळे उत्पन्नाच्या आशा बळावल्या होत्या. या अपेक्षेने शेतकर्यांनी खत, फवारणीच्या खर्चास आपला आर्थिक हात सैल केला होता.
यंदा दर जास्त राहतील आणि उत्पनही हाती येईल, त्याने दोन -तीन वर्षार्ंत झालेल्या नुकसानीस हातभार लागेल, कर्ज फिटण्यास मदत होईल, अशी आशा होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा धोका दिला. सलग आठ दिवस सततच्या पावसाने पिक वाया गेले.
महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात उदासीनता
महसूलमत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकर्यांना सहकार्य करण्यास उदासीनता दाखवली, तर ही खेदाचीबाब असल्याने संबंधीत अधिकारी व कर्मचार्यांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली.