Murder : एकाने पाठीमागून पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले, मालेगावात तरुणाचा निर्घृण खून | पुढारी

Murder : एकाने पाठीमागून पकडले दुसऱ्याने चाकूने भोसकले, मालेगावात तरुणाचा निर्घृण खून

नाशिक, मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मागील भांडणाच्या कुरापतीतून दोघांनी तरुणाचा भोसकून खून (Murder) केल्याची घटना रजियापुरा भागातील ताज पार्कजवळ बुधवारी (दि.2) सायंकाळी घडली. समीर शहा असलम शहा (17) असे मयताचे नाव आहे. त्याचे वडील असमल शहा यांनी रमजानपुरा पोलिस ठाण्यात बुधवारी गुरुवारी फिर्याद नोंदवली.

शहा कुटुंब हे बुधवारी सकाळी दरेगावमधील बहिणीच्या घरी गेले होते. तेथून पाच वाजेच्या सुमारास मुलगा समीर हा पुढे घराकडे निघून आला. त्याला ताज पार्कजवळ दोघांनी गाठून वाद घातला. त्यातील बकरी चोर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या तरुणाने समीरला पाठीमागून पकडून त्याच्या भावाने चाकूने पोटात भोसकले. जखमी अवस्थेत समीरने वडिलांना फोन करून घटनाक्रम सांगत मदतीसाठी धाव केला. दरम्यान, त्याला नागरिकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. घाव वर्मी आणि रक्तस्राव अधिक होत असल्याने त्याला धुळे शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button