२१ दिवसांच्या बाळाच्या पोटात सापडले ८ भ्रूण | पुढारी

२१ दिवसांच्या बाळाच्या पोटात सापडले ८ भ्रूण

रांची : येथील 21 दिवसांच्या बाळाच्या पोटातून चक्क आठ भ्रूण काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बाळाच्या पोटातून 8 भ्रूण काढल्याने डॉक्टरही बुचकळ्यात पडले आहेत. बाळाच्या पोटात भ्रूणांची वाढ होत असल्याची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. ही आतापर्यंतची सर्वात दुर्मीळ घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देशात बाळाच्या पोटात भ्रूणांची वाढ झाले असल्याचे यापूर्वी 10 केस समोर आल्या होत्या. मात्र, त्या बाळांच्या पोटात एक अथवा दोनच भ्रूण सापडले होते.

मात्र, 21 दिवसांच्या बाळाच्या पोटात चक्क 8 भ्रूण सापडल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. या मुलीचे आई-वडिल रामगढ येथील रहिवासी असून 10 ऑक्टोबरला बाळाचा जन्म झाला, त्यावेळी बाळाचे पोट सुजले होते, त्यानंतर दोन दिवसांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले. बाळाचे ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून 8 भ्रूण काढले.

डॉ. इम्रान म्हणाले की, एखाद्या बाळाच्या पोटातून 8 भ्रूण काढले ही जगातील पहिलीच घटना आहे. त्याला शास्त्रीय भाषेत फिटस् इन फिटू म्हटले जाते. जगात अशा प्रकारच्या सुमारे 200 केसीस मिळाल्या असून त्यांच्या पोटात एक अथवा दोनच भ्रूण सापडले. मात्र, 21 दिवसांच्या बाळाच्या पोटातून 8 भ्रूण काढले ही आतापर्यंतची सर्वात दुर्मीळ घटना आहेे.

Back to top button