राजगुरूनगर : कंपनीच्या लिक्विडची जाहिरात करायला आले आणि मंगळसुत्र पळवले | पुढारी

राजगुरूनगर : कंपनीच्या लिक्विडची जाहिरात करायला आले आणि मंगळसुत्र पळवले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: कंपनीच्या बहुपयोगी लिक्विडची जाहिरात करायला आलो आहे, असे सांगुन घरात आल्यावर गप्पा मारत विश्वास संपादन करून सोने उजळवून देतो असे सांगत गृहिणीच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे मंगळसुत्र अज्ञात २ चोरटयांनी पळवल्याचा खळबळजनक प्रकार खरपुडी बु. (ता. खेड) येथे घडला आहे. मंगल अशोक काशिद, (वय ५०) यांनी त्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या घटनेत तक्रारदार मंगल काशीद यांचे १ तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र त्यावरील वाटया अशी ४५ हजार रुपयांची चोरी झाली आहे. शहर किंवा ग्रामीण वाड्या वस्त्यांवर असे अनेक फिरस्ते विविध वस्तु, पदार्थ विक्रीसाठी घेऊन येतात. महिला किंवा वृद्ध व्यक्तींना भुरळ घालुन विश्वास संपादन करून अशा चोऱ्या करतात. असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे किंवा तातडीने संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button