नाशिक : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा | पुढारी

नाशिक : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील श्री सहस्त्रार्जुन भवनमध्ये श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आद्य पुरुष श्री राजराजेश्र्वर सहस्त्रार्जुन भगवान यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रियसमाज यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच श्री सहस्त्रार्जुन महाराज महायाग ह्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने आनंदी व सुमंगल वातावरणात पार पडलेल्या सोहळ्याप्रसंगी श्री अमीत गायधनी गुरूजींनी पौरोहित्य केले.

सोमवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी परिसरातून पारंपरिक मिरवणूक  काढण्यात आल्याने यामध्ये सर्व समाज बांधवांनी उत्साहात ढोल ताशांच्या गजरात सहभाग नोंदवला. तसेच यावेळी मर्दानी खेळांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सिमा कंकरेज यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत नंदकुमार क्षत्रिय प्रास्ताविक यांनी केले. समाजाच्या अध्यक्षा विजया एकनाथ कंकरेज व प्रमुख अतिथी डाॅ. किशोर पहिलवान यांनी मनोगत व्यक्त केले. समाजासाठी विकासात्मक कामे करुन प्रगतीपथावर पोहचवण्यासाठी सकारात्मक व संघटित होऊन एकत्र येण्याचे आवाहन समाजाचे सचिव कृष्णा कंकरेज यांनी केले. याप्रसंगी महिला मंडळाच्या लता बारड, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे विजय पेटकर, युवक मंडळाचे प्रविण बिल्लाडे व सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज नाशिक कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी चंद्रकांत पहिलवान, सतीश बिल्लाडे, सचिन बाकळे,  सुधीर क्षत्रिय,  उज्ज्वल टाक, कैलास कुक्कर, प्रशांत कोकणे, चेतन खानापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button