Avatar the Way of Water: अवतार द वे ऑफ वॉटरमधील पेंडोराची शानदार दुनिया पाहतचं राहाल | पुढारी

Avatar the Way of Water: अवतार द वे ऑफ वॉटरमधील पेंडोराची शानदार दुनिया पाहतचं राहाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ चा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या चित्रपटाची कथा २००९ मध्ये आलेल्या ‘अवतार’च्या पुढे असणार आहे. (Avatar the Way of Water) याआधीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. आता १३ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा लोकांवर जादू करायला सज्ज झाला आहे. (Avatar the Way of Water)

पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटातील पात्रे राहतील. पण यावेळी लोकांना पूर्वीपेक्षा अधिक साहस पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावेळी लोकांना पाण्याच्या वेगळ्या दुनियेची ओळख करून देईल. या चित्रपटाचा नवीन ट्रेलर अवतारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये पेंडोराच्या जगाचे नेत्रदीपक दृश्य परिणाम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

ट्रेलर समोर आल्यानंतर आता चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी १३ वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहे. पहिल्या दिवशीच बघेन. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘या चित्रपटाची आता प्रतीक्षा करू शकत नाही.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर…’ याशिवाय अनेक यूजर्स या ट्रेलरवर फायर इमोजी देखील शेअर करत आहेत.

हा चित्रपट १६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरून यांनी केले आहे. त्याचा पहिला भागही त्यांनी दिग्दर्शित केला. रिलीज झाल्यानंतर अवतारने जगभरात भरपूर कमाई केली होती. आता या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवरही अशाच कामगिरीची अपेक्षा निर्मात्यांना आहे.

Back to top button