राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला नाशिकमधून बळ | पुढारी

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला नाशिकमधून बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, या यात्रेला नाशिकमधूनही मोठे पाठबळ उभे करण्याचा निर्धार जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

शहरातील एमजी रोडवरील काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत जोडो यात्रेसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. राहुल गांधी यांच्या यात्रेत तीन प्रकारचे यात्री सहभागी आहेत. त्यात भारत यात्री, राज्य यात्री आणि जिल्हा यात्री या पद्धतीने विभागणी करून ते यात्रेत सहभागी होत आहेत. यात्रेत अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्धार यावेळी केला.

भारत जोडो यात्रा,www.pudhari.news
नाशिक : काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या बैठकीत बोलताना पक्षनिरीक्षक प्रशांत पवार.

यावेळी हनिफ बशीर, ईशाक कुरेशी, उमाकांत गवळी, अरुण दोंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्यूली डिसूझा, अ‍ॅड. मीना वाघ, माया काळे, सारिका किर, अमोल मरसाळे, विलासराज बागूल, सुभाष हिरे, अशोक शेंडगे, पवन जगताप, राजेश लोखंडे, रूपचंद साळवे, संजय खैरनार, प्रकाश उबाळे, दिलीप अंबापुरे, अ‍ॅड. विकास पाथरे, शिवाजी बर्डे, श्रावण बोडके, संजय जाधव आदी उपस्थित होते. मनोहर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. प्रकाश खळे यांनी आभार मानले.

समाजवादी विचारसरणीचे नागरिक सहभागी होणार
पक्षनिरीक्षक प्रशांत पवार यांनी भारत जोडो यात्रेच्या सहभागासंदर्भात पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अनुसूचित जाती विभागाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. पण, समाजवादी विचारसरणीच्या लोकांना सहभागी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित अध्यक्षांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केली. बैठकीत सुरेश मारू, रमेश साळवे, कुसुम चव्हाण, सुभाष हिरे, राजेश लोखंडे, मिलिंद हांडोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button