IPL 2023 : पंजाब किंग्जच्या संघात होणार बदल; 'या' भारतीय फलंदाजाची होणार कर्णधारपदी निवड | पुढारी

IPL 2023 : पंजाब किंग्जच्या संघात होणार बदल; 'या' भारतीय फलंदाजाची होणार कर्णधारपदी निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार असणार आहे. बुधवारी (दि.२) फ्रेंचाइजीकडून घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (IPL 2023)

यापूर्वी पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयांक अग्रवालवर होती. मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्याच्या नेतृत्वात संघ प्लेऑफ पर्यंतही पोहचू शकला नव्हता, यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. मयांक अग्रवाल आयपीएल २०२२ मध्ये केवळ १९६ धावा करु शकला होता. (IPL 2023)

के.एल.राहुल लखनौ सुपर जायंट्सच्या संघात गेल्यानंतर मयांक अग्रवालवर पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर पंजाब किंग्जकडून शिखर धवनकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावेळी मयांक अग्रवालच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले होते. (IPL 2023)

हेही वाचलंत का?

Back to top button