पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी | पुढारी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे भरत सैंदाणे क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंगचा आनंद लुटला. मंत्री पाटील यांनी चौकार मारल्यानंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. एरवी भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी दाखवली.

नांदेड येथे भारत सैंदाणे आयोजित क्रिकेट क्लबतर्फे रविवार, दि. 30 पासून क्रिकेट स्पर्धेस सुरूवात झाली आहे. स्पर्धेत १२ संघ सहभागी असून पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते येथील स्टार क्लबविरूध्द सन्नाटा क्रिकेट क्लब या संघातील सामन्याचा टॉस करण्यात आला. नंतर पालकमंत्र्यांनी या स्पर्धेचे उदघाटन झाले. सकाळी नांदेड येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेतील पहिले बक्षीस भगवान महाजन यांच्याकडून रु. ५६५६, दुसरे बक्षीस कृणाल इंगळे यांच्याकडून रु. ३५३५ आणि अतुल पटेल यांच्याकडून तिसरे बक्षीस रु. २५२५ पारितोषिके जाहीर करण्यात आले आहे.

पराजय देखील खिलाडूपणाने मान्य करावा…

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.

राजा हुकला तो संपला ….

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला …… हे गीत म्हणून त्यांनी क्रिकेट व जीवनातील साम्य विशद केले. यावेळी येथील युवकांसाठी साहित्यासह व्यायामशाळा मंजूर करणारा असल्याचे सांगून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा:

Back to top button