

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी (ICC) पुरुष टी 20 विश्वचषक स्पर्धेचा 29 वा सामना आहे. पर्थ स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदरलँड्स (PAK vs NED) यांच्यात खेळल्या जात असलेला हा सुपर-12 च्या गट-2 मधील सामना आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडच्या संघाने 20 षटकात 9 गडी बाद 91 धावाच करता आल्या. कॉलिन अकरमनने 27 चेंडूत 27 धावा केल्या. त्याच्याशिवाय स्कॉट एडवर्ड्सने 15 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानसाठी शादाब खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद वसीम ज्युनियरला दोन आणि शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
पाकिस्तानच्या संघाने भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले दोन सामने गमावले आहेत तर नेदरलँड संघानेही आपले दोन्ही सामने गमावले आहेत. दोन्ही संघ अजूनही या स्पर्धेत पहिला विजय मिळवण्यापासून दूर आहेत. टी 20 च्या इतिहासात पाकिस्तान आणि नेदरलँड्स आजच्या सामन्याआधी फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. 2009 मध्ये डच संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानने लॉर्ड्सवर 82 धावांनी विजय मिळवला होता.