त्र्यंबक राजाच्या दर्शनबारीत सुविधांची भर, स्वयंचलीत ई -टॉयलेटची उभारणी

स्वयंचलित ई टॉयलेट, www.pudhari.news
स्वयंचलित ई टॉयलेट, www.pudhari.news
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित ईलेक्टॉनिक- इको -टॉयलेट कार्यान्वित झाले आहे. देशविदेशातून ञ्यंबकराजाच्या दरबारी भाविक येतात त्यांना येथे आल्यानंतर सुखदायी वाटावे म्हणून ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्राधान्याने काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी चेअरमनपदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून न्या. विकास कुलकर्णी यांनी सेवासुविधा निर्माण करतांना त्यात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेत अद्यावत सुविधांचा पाठपुरावा केला आहे. यासाठी त्यांना विश्वस्त  तृप्ती धारणे,  अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम, दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल आणि सचिव मुख्याधिकारी संजय जाधव यांनी वेळोवेळी मंडळाची बैठका घेत एकमताने ठरावा मंजूर केले आहेत. येणारा भाविक केंद्रबिंदू ठेवून सातत्याने सोयी सुविधाचा पाठपुरावा केला आहे. यावर्षीच्या जुलै महिन्यात पूर्व दरवाजा दर्शनबारी मंडपाचे बहुतांश काम पुर्ण झाले आणि भाविकांना अद्यावत अशा सुविधांचे दर्शन घडले. सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या दर्शनबारीस साजेशा मुलभूत सुविधा आपेक्षित होत्या आणि त्या पुरवल्या जात आहेत. नुकतेच येथे स्वयंचलित ई-टॉयलेट सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे. यातील टॉयलेट आणि युरीनल यांचे प्रत्येकी चार युनिट सेवेत रुजू झाले आहेत. त्यामध्ये आणखी 22 युनीटची भर पडणार आहे.

असे आहे स्वयंचलीत ईलेक्टॉनीक- इको -टॉयलेट…

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सर्वाधिक समस्या असते ती स्वच्छतेची. येथे मात्र स्वयंचलीत फ्लश यंत्रणा आहे. दरवाजा उघडल्या नंतर स्वयंचलीत फ्लश यंत्रणा सुरू होते. आतील व्यक्ती बाहेर आल्या नंतर संपुर्ण युनिट आतून धुतले व स्वच्छ केले जाते. पाण्याच्या टाकीची पातळी स्वयंचलीत पध्दतीने भरलेली ठेवली जाते. भाविक त्याचा वापर करून बाहेर आल्या नंतर पाय धुण्यासाठी स्वयंचलीत इलेक्ट्रॉनीक यंत्रणेवर चालणारे नळ बसविण्यात आले आहेत. लहान मुलांचे डायपर नष्ट करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. सांडपाणी व मैला यांचे विघटन करणारा अद्यावत प्लॅन्ट येथे बसविण्यात आला आहे. दर्शन रांगेतून आवश्यकता भासल्यास येथे आलेला भाविक अनवाणी पावलांनी आलेले असेल त्यांच्यासाठी येथे चप्पल देखील उपलबध्द असेल. विशेष म्हणजे यासाठी लागणारे सर्व पाणी हे जलशुध्दीकरण यंत्रातून बाहेर आलेले टाकावू पाणी आहे. पाण्याची बचत करणारी आणि बॅटरी बॅकअपवर चालणारी यंत्रणा आता भाविकांना अधिक सुखदायी अनुभव देणारी आहे.

नाशिकच्या मखमलाबाद पंचवटी येथील आर्या टेक्नालॉजी या कंपनीने या ईलेक्टॉनीक- इको -टॉयलेटची उभारणी केली आहे. अशा प्रकारची सुविधा आता पर्यंत केवळ उटी, कुलु मनाली अशा पर्यटनस्थळावर उभारण्यात आलेली आहे. देवस्थानांवर दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी प्रथमच ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने अशा प्रकारची सुविधा उपलबद्द करून दिली आहे. येथे आलेले देशभरातील भाविक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news