Ramiz Raja: रमीझ राजाने विराटवर केलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी अँकरने दिला ‘करारा जवाब’ | पुढारी

Ramiz Raja: रमीझ राजाने विराटवर केलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी अँकरने दिला 'करारा जवाब'

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा त्यांच्या क्रिकेटमधील टिप्पण्यांबद्दल कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर अँकरने असं काही उत्तर दिलं की राजांची बोलती बंद झाली. विराट कोहलीच्या ७१ व्या शतकावर त्यांनी याठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशिया कप २०२२ (Asia Cup) मध्ये अफगाणिस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने शतक झळकावले होते. कोहलीच्या या शतकाची मीडियावर खूप प्रशंसा झाली होती. याबद्दल एका मुलाखतीत बोलताना रमीझ राजा म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूने असे शकत झळकावले तर मीडिया इतकी स्तुती का करत नाही जितकी कोहलीची झाली. याला न्यूज अँकरने उत्तर देताना म्हटले, कित्तेक खेळाडू शतक बनवत असतात, पण कोहलीचे ते शतक त्याचे ७१ वे शतक तर होतेच सोबत त्यांने तब्बल तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक बनवले होते.

दरम्यान, याच मुलाखतीमध्ये राजाने अफगाणिस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये विराटचे चार झेल सुटले होते. याबद्दल का बोलले जात नाही असा सवाल केला. याला अँकरने दिलेले उत्तरही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती म्हणते, ‘याला प्रकृतीचा नियम इतकंच म्हणू शकतो.’

हे वाचलंत का?

 

Back to top button