सातारा : दोघेजण भाजप पुजारी टोळीसारखी चालवत आहेत | पुढारी

सातारा : दोघेजण भाजप पुजारी टोळीसारखी चालवत आहेत

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : माझं आणि जयकुमार गोरेंचं काय वाकडं आहे? गोल तोंड, चपटे नाक अन् भसाडा आवाज त्यात काय एवढं! त्यांच्या जोडीला दिला आहे एक बोकड. हे दोघे भाजप पुजारी टोळीसारखी चालवत आहेत. भाजप काय यांच्या मालकीचा आहे का? पुढारी म्हणून आमचे आख्खे आयुष्य गेले आहे. तुमच्यासारखे अनेक छपरी पाहिले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गंडवलेले हे दोघे नेते म्हणून तुमच्यासमोर येतात. यांनी भाजपमधील हिंदुत्व या शब्दातील ‘त’ ला ‘व’ जोडून दाखवावा, अशा शब्दात विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्यावर घणाघाती टिका केली. कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात आ. रामराजे ना. निंबाळकर बोलत होते. यावेळ खा.

श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेबपाटील, आ. शशिकांत शिंदे, आ.दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंगबाबा पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस आ. रामराजे व आ. जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष दोघेजण भाजप पुजारी टोळीसारखी चालवत आहेत कोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलताना आ. रामराजे ना. निंबाळकर. व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण व इतर. आ. रामराजेंची खा. रणजितसिंह, आ.

जयकुमार गोरे यांच्यावर घणाघाती टीका टिपेला पोहोचला आहे. आ. जयकुमार गोरे सातत्याने रामराजेंवर टिकास्त्र सोडत असताना आ. रामराजे मात्र कधी स्टेटस्मधून तर कधी चिमटा काढून उत्तर देत होते. कोरेगावच्या सभेत मात्र त्यांनी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी व शेलक्या शब्दात टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, महाराष्ट  आणि कर्नाटकाच्या विकासाच्या अनुषंगाने मुंबई-बंगळूर औद्योगिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरची रचना करण्यात आली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासह म्हसवडची पाहणी करण्यात आली.

त्यावेळी विरोधकांना त्याची साधी माहिती सुद्धा नव्हती, आज जे कॉरिडॉर बाबत बोलत आहेत, त्यांना कॉरिडॉरचा अर्थ तरी माहिती आहे का? आणि ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. म्हसवडला कॉरिडॉर करण्याबाबत कोणताही विरोध नाही, मात्र कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी केंद्राची नाहीतर महाराष्ट्राची तरी औद्योगिक वसाहत उभारा, अशी मागणीही आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी केली. आ. रामराजे म्हणाले, केंद्र सरकारने काढलेल्या कॉरिडोरच्या स्किममध्ये जिल्ह्याची निवड झाली आहे. यासाठी मागच्या सरकारने म्हसवडचे नाव सुचवले होते. आज हा बहाद्दर तोंड वासून बोलतोय. कॉरिडॉरचा अर्थही माहिती नाही आणि हा जिल्ह्याचा अध्यक्ष झाला आहे. आमदारांच्या जोडीला कोण दिला तर बोकड. त्यांचा मुक्काम मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये नाही तर ट ?ायडंट हॉटेलमध्ये. तिथेच सगळं त्यांच चालतं. जिल्ह्यातील भाजप हे दोघे पुजारी टोळीसारखे चालवत आहेत. माझे आणि जयकुमार गोरे यांचे काय वाकडे आहे. गोल तोंड, चपटे नाक अन् भसाडा आवाज त्यात काय एवढं ! वाद विवाद घालण्यास मर्यादा असतात. पण ही कुठली पध्दत. माझ्यावर आरोप झाले की भाजपमध्ये मी जातोय म्हणून पण मला भाजपने घेतलं पाहिजे ना. भाजप काय तुमच्या मालकीचा आहे का? तुमच्यासारखे किती छपरी बघितलेत. पुढारी म्हणून माझं आख्ख आयुष्य गेलयं. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना बसल्या बसल्या गंडवलेले हे दोघे नेते म्हणून तुमच्यासमोर येतात.

फलटणमध्ये त्यांची माणसे किती तर दहाच. त्यांना अडकवायला त्यांच्याच नावावर कर्ज घेवून हिंडायचे. हिंदूत्व म्हणजे काय? या दोघांनी फक्त त ला व काढून दाखवावं आणि मग बोलावं, असा टोलाही रामराजेंनी लगावला. कॉरिडॉरबाबत स्वत: अजितदादांनी मला सांगितले होते. त्यावर मी त्यांना तेथे एमआयडीसी होवू द्या, ऑर्डर होवू द्या तिथला विकास होवू द्या असे म्हणालो होतो. कोरेगाव आणि खटावलाच फक्त एमआयडीसी द्यायची राहिली आहे. कॉरिडॉरला घ्यायची नसेल तर नका घेवू आम्हाला किमान महाराष्ट्राची तरी एमआयडीसी येवू द्या. एमआयडीसीच्या सर्व मान्यता या अजितदादा आणि प्रभाकर देशमुख यांनी आणल्या आहेत. यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या एमआयडीसीची मागणी केली त्यात आमचे काय चुकले? केंद्राचा जिल्ह्याला मान मिळाला आहे कुठेतरी एमआयडीसी होत आहे. विकासाच्या दृष्टीने कोरेगावात काय चूक झाली असेल तर ती म्हणजे 6 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग असताना एमआयडीसी मंजूर केली असती तर युवकांना रोजगार मिळाला असता. म्हसवडला होते तर आम्हालाही द्या असे कोणीतरी म्हणा की मी एकट्यानेच म्हणायचे, असा टोला त्यांनी आ. शशिकांत शिंदेंना लगावला.

तालुक्यात माझ्या लोकांनी माझं ऐकलं. आज तालुक्यात 6 हजार मुलांना रोजगार मिळाला. जिल्ह्याचे पुनर्वसन खंडाळा आणि फलटणमध्ये होत आहे. 27 हजार कुटूंबांचे पुनर्वसन केले आहे. उत्तर कोरेगावातील फक्त 37 गावांमध्ये आरडाओरडा चालायचा हे किती चालायचं? आ. शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणुकीतील पराभवानंतर मला बुथ कमिट्यांचे महत्व जाणवू लागले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बूथ निहाय कमिट्या अधिक भक्कम करणे आवश्यक आहे. मतदारसंघातील युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, सुनील माने व शिवाजीराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते.

Back to top button