नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या शोभायात्रेने वेधले लक्ष | पुढारी

नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या शोभायात्रेने वेधले लक्ष

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

स्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली होती. यात विविध वाहनांवर अमेरिका, लंडन, आफ्रिका, मुंबई, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्रातील फेटे परिधान केलेले भाविक लक्ष वेधून घेतले..

नागरिकांना सुख, शांती मिळावी, वैदिक शास्त्राप्रमाणे भगवंताची दृष्टी ज्या शहरावर पडते त्या शहराचे आयुष्य वाढते, या उद्देशाने नगरयात्रा काढण्यात आली. शहरातील गोल्फ क्लब मैदान, सावरकर जलतरण तलाव सिग्नल, त्र्यंबक नाका सिग्नल, सीबीएस सिग्नल, शालिमार सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमाणी बसस्टॅण्ड, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, तपोवन कॉर्नर पिलर नंबर ४४ दिगंबर आखाडा या मुख्य मार्गवरून ५.२ कि.मी अंतर पार करत नूतन बी. ए. पी. एस. स्वामीनारायण मंदिर केवडीवन येथे यात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत विविध कलात्मक रथावर नूतन बी. ए. पी. एस. स्वामीनारायण मंदिरात प्रतिष्ठित करण्यात येणारे २२ भगवंत व संतांच्या मूर्ती होत्या. सिंहरथावर श्री अक्षरपुरुषोत्तम महाराज, घोडेरथावर श्री घनश्याम महाराज, मयूर रथावर श्री हरिकृष्ण महाराज व श्री नीलकंठवर्णी महाराज, हत्तीरथावर श्री लक्ष्मीनारायण भगवान, मोरपीस रथावर श्री विठ्ठल- रुख्मिणीजी, मुक्त हसतरथावर श्री हनुमान, श्री सीता राम, श्री शिव-पार्वती, श्वेतहंस रथावर श्री गणेश भगवान, शिखरस्थावर मोरपंख रथावर राधा-कृष्ण, त्रिशूल रथावर व मुक्त हस्त रथावर गुरुपरंपरेची मूर्ती असे एकूण ११ विविध कलात्मक रथ होते.

विदेशातून भाविक दाखल : भव्य नगर शोभायात्रेत सुरुवातीला जीप, घोडे पथक, बाइक रॅली, बैलगाडीवर फेटेधारी तसेच नाशिक व खान्देशातील युवा-युवती ध्वजासह सहभागी होते. इतर विविध वाहनांवर अमेरिका, लंडन, आफ्रिका व मुंबई, गुजरात, राजस्थान महाराष्ट्रतील फेटेधारी भाविक भक्त उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button