जामनेर आणि बोदवड येथे तपासणी : जिल्ह्यात एकूण ५.५० लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि. मी. परिघासह अन्य गावातील २ लाख २३हजार ५१२ पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असून विशेषतः गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तसेच पुणे येथील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.परकाडे, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय (मापसु) चे डॉ.गायकवाड यांच्यासह ४ असिंस्टंट प्रोफेसर यांचे पथक जिल्हा दौर्यावर आले आहेत. या पथकातर्फे जामनेर आणि बोदवड येथे लसीकरण मोहिमेसह पशुपालकांना पशुधनाची घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले जात आहे, असे उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग जळगाव डॉ. श्यामकांत पाटील यांनी सांगितले आहे.