जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण | पुढारी

जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बोदवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी चक्क सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे.

ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची त्वरीत नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाव्दारे रहिवासी प्रमोद धामोडे यांनी केली होती. पूर्णवेळ तहसीलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी येणार्‍या ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. याबाबत बर्‍याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने सोमवार, दि. 19 पासून बोदवड तहसील कार्यालयाबाहेर पूर्णवेळ तहसीलदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत सरणावर झोपून आमरण उपोषणास कायम ठेवणार असल्याचा इशारा धामोडे यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button