लग्नाचा मुख्य उद्देश शरीरसुख नव्हे तर वंशवृद्धी : मद्रास उच्च न्यायालय

लग्नाचा मुख्य उद्देश शरीरसुख नव्हे तर वंशवृद्धी : मद्रास उच्च न्यायालय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन लग्न करणाऱ्या जोडप्यांनी विवाह फक्त शरीरिक सुखासाठी नाही, त्याचा उद्देश वंशवृद्धी हा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी मुलांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या एका खटल्यात हे मत व्यक्त केले . ते म्हणाले, "विभक्त झालेल्या दोन व्यक्ती जेव्हा मुलांच्या हक्कासाठी भांडतात तेव्हा अशा वादामुळे ही मुले फक्त शारीरिक सुखातून जन्माला आली आहेत, असे चित्र निर्माण करतात." (Marriage is not merely for sexual pleasure, its main purpose is to progenate: Madras High Court)

"न्यायालयाचे असे मत आहे की, ज्यांनी लग्न केले आहे, त्यांनी विवाह फक्त शारीरिक सुखासाठी नसतो, तर वंशवृद्धीसाठी असतो, त्यातून कुटुंबसाखळी वाढत जाते. अशा नात्यातून जन्माला आलेली मुलं ही दोन व्यक्तीतील साखळी असतात. हे लक्षात ठेवले पाहिजे," असे निरीक्षणही न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी नोंदवले.

एक महिला वकिलाने उच्च न्यायालयात अल्पवयीन मुलांचा ताबा मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. या सुनावणीवेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या जोडप्याचं लग्न २००९ला झाले. त्यानंतर एप्रिल २०२१ला त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ही महिला स्वतंत्र राहू लागली, तर पती मुलांसमवेत राहात आहे.

सुरुवातील आईला मुलांना भेटण्याचा अधिकार न्यायालयाने दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की पती या आदेशाचे पालन करत नाही, तसेच मुलांच्या मनात आईबद्दल द्वेष निर्माण करत आहे. यावर न्यायमूर्तींनी मुलांच्या मनात आईबद्दल द्वेष भावना निर्माण करणे ही क्रुरता असून, ती एक प्रकारे मुलांचा छळ आहे, असे म्हटलं होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news