धुळे : शासनालाच घातला एक कोटी 21 लाखांचा गंडा, सात शिक्षकांविरोधात गुन्हा | पुढारी

धुळे : शासनालाच घातला एक कोटी 21 लाखांचा गंडा, सात शिक्षकांविरोधात गुन्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बनावट कागदपत्रांच्या आधारावर विशेष शिक्षक म्हणून कार्यरत राहून शासनाला तब्बल एक कोटी 21 लाख 56 हजार 413 रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने केलेल्या तक्रारीनुसार एका संस्थेच्या अध्यक्षासह सात विशेष शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात शासनाची एक कोटी 21 लाख 56 हजार 413 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र जोशी यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीत या बनावट विषय शिक्षकांनी केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना अंतर्गत पूर्व नियोजन करून इतरांच्या मदतीने बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शासनाच्या सेवेत सहभागी झाले. याविषयी शिक्षकांनी कार्यरत राहून शासनाची एक कोटी 21 लाख 56 हजार 413 रुपयाची वेतन घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार धुळे येथील जय भवानी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शांताराम बेहरे, सोनगीर येथील एन. जी बागुल हायस्कूलचे शिक्षक हेमराज रवींद्र पाटील, देवपुरातील हाजी बदलू, सरदार हायस्कूलचे शिक्षक उल्हास सूर्यवंशी, साक्री रोडवरील स्वामी टेऊराम हायस्कूलचे शिक्षक रंजीत झुंबरलाल पाटील, साक्री तालुक्यातील अर्धे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षिका प्रतिभा दिनकर बेहेरे, शिंदखेडा तालुक्यातील जखाने येथील शिक्षक संजय दिनकर बेहेरे व जखाने विद्यालयाचे शिक्षक अतुल संतोष मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button