SCO Summit 2022 : वाराणसी बनणार SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी  | पुढारी

SCO Summit 2022 : वाराणसी बनणार SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर प्रदेश मधील वाराणसी हे शहर शांघाय सहकार संघटनेने (SCO – Shanghai Cooperation Organisation)ने सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. (SCO Summit 2022) ही शांघाय सहकार संघटनेची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असणार आहे. ही २०२२-२३ साठी राजधानी असणार आहे. याला शांघाय सहकार संघटनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वाना यांनी दिली.
SCO Summit 2022
SCO Summit 2022
उज्बेकिस्तान मधील समरकंद शहरात  शांघाय सहकार संघटनेचे (SCO – Shanghai Cooperation Organisation) शिखर संमेलन झाले. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विनय क्वाना यांनी सांगितले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२-२३ साठी वाराणसीला  शांघाय सहकार संघटनेची पर्यटक आणि सांस्कृतिक राजधानी घोषीत केले यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यामुळे भारत आणि शांघाय सहकार संघटना यांच्यातील  सांस्कृतिक आणि लोक यामधील संबंध दृढ होतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

परराष्ट्र सचिव म्हणाले की, वाराणसीला मिळालेली ही ओळख साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकरारच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित करेल.त्याचबरोबर शांघाय सहकार संघटनेने भारताच्या मदतीने ‘स्टार्टअप’ आणि इनोव्हेशनवर विशेष कार्य गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिखर संमेलनात बेलारुस आणि इराणला शांघाय सहकार संघटनेचे प्रतिनीधीत्व देण्याचेही घोषीत केले.  

वाराणसी

हेही वाचलंत का?

Back to top button