कोल्हापूर : लैंगिक अत्याचार करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला अटक | पुढारी

कोल्हापूर : लैंगिक अत्याचार करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला अटक

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील एका गावात एका तरुणाने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकऱणी पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून बालक लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (पोस्को) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.  पन्हाळा पोलिसांनी संशयित आरोपी सचिन अरुण पाटील यास ताब्यात घेतले आहे.

पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सचिन पाटील (वय ३३) याचा कोतोली येथे  हॉटेल व्यवसाय आहे. संशयित आरोपी याची पीडित मुलीच्या घरी सतत ये-जा होती. याचा गैरफायदा घेऊन  सचिन पाटील याने पीडित मुलगीबरोबर जानेवारी २० २२ ते मार्च २०२२ या काळात मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, पीडित मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी कोल्हापूर येथे नेले असता डॉक्टरांनी पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर तिच्या आई व नातेवाईकांनी सरळ पन्हाळा पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली. पन्हाळा पोलिसांनी याबाबत पीडित मुलीचा जबाब घेतला असता पीडित मुलीने गावातील सचिन पाटील या तरूणाने वेळीवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले.

पन्हाळा पोलिसांनी सचिन अरुण पाटील यास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button